मी गोंधळते, चिंतातुर होते, खचून जाते, पण स्वत:लाच प्रश्न विचारते की, अशा वेळी संजीवने कोणता निर्णय घेतला असता? आणि मला मार्ग दिसू लागतो.
ही लढाई सुरूच राहील. संजीवचा हा लढा केवळ एका व्यक्तिविरोधात नाही, एका पक्षाच्या विरोधात नाही, तर एका विशिष्ट संकुचित विचारधारेविरुद्ध आहे. आपल्या स्वार्थासाठी भीती आणि द्वेष पसरवणार्यांविरोधात आहे. संजीवच्या दृष्टीकोनातून भारत म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नाही, तर त्याच्या दृष्टीने कोणीही इथे संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगू शकेल, सुरक्षित आणि शांतीपूर्ण जीवन जगता येईल. द्वेष आणि भीतीपासून मुक्तता असेल.......